in , , ,

Sant Gadge Maharaj information in Marathi – संत गाडगे महाराज यांची माहिती

Sant Gadge Maharaj information in Marathi - गाडगे महाराज यांची माहिती

Sant Gadge Maharaj information in Marathi – संत गाडगे महाराज यांची माहिती

गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते.

त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.

विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

ते अजूनही भारतातील सामान्य लोकांबद्दल आदरणीय आहेत आणि विविध राजकीय पक्ष आणि अशासकीय संस्थांचे ते प्रेरणास्थान आहेत.

Sant Gadge Maharaj Short Biography in Marathi – संत गाडगे महाराज यांची थोडक्यात माहिती

पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर
जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी
जन्मस्थान अंजनगाव, अमरावती, महाराष्ट्र, भारत
मृत्यू २० डिसेंबर १९५६
वडील झिंगराजी राणोजी जाणोरकर
आई सखुबाई झिंगराजी जणोरकर
पत्नीचे नाव
व्यवसाय समाजसुधारक
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी

सुरुवातीचे जीवन – Sant Gadge Maharaj life

त्यांचे मूळ नाव देबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेंदगाव या गावी धोबी (वाशरमन जाती) कुटुंबात झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव – झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव – सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते.

गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते.

त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.

सामाजिक कार्य – Social work

गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते.

“तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी|” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.

“देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.

माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली.

रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

कीर्तनाचा मार्ग

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला.

आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत.

चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.

‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान – Sant Gadgebaba Village Cleanliness Campaign

बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन शासनाने २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली.

शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्नाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन , मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फुर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केला.


हे पण वाचा : संत गाडगे महाराज यांचे १४ विचार


More info : Wiki


तुम्हाला दिलेली संत गाडगे महाराज(Sant Gadge Maharaj information in Marathi) यांची माहिती आवडली असेल. हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद

Alka Yagnik Biography in Marathi - अलका याज्ञिक यांचे जीवनचरित्र

Alka Yagnik Biography in Marathi – अलका याज्ञिक यांचे जीवनचरित्र

Rohit Sharma Information in Marathi - रोहित शर्मा यांची मराठीत माहिती

Rohit Sharma Information in Marathi – रोहित शर्मा यांची मराठीत माहिती