in , , ,

विराट कोहली यांचे जीवनचरित्र – Virat Kohli Biography in Marathi

विराट कोहली यांचे जीवनचरित्र - Virat Kohli Biography in Marathi

Virat Kohli Biography in Marathi – विराट कोहली यांचे जीवनचरित्र

विराट कोहली हे भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे.

उजव्या हाताने फलंदाजी करणार्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून ते खेळतात, आणि २०१३ पासून ते त्या संघाचा कर्णधार आहेत. कर्णधार झाल्यापासून ते खूप अचूक फलंदाजी खेळतात.

कोहली यांचे नाव इएसपीएन(ESPN) च्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.

२००८ साली मलेशियामध्ये झालेल्या अंडर १९ वयोगटातील विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद त्यांच्या कडे होते.

त्यानंतर त्यांनी एकदिवसीय सामन्यात प्रवेश केला. २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता.

त्यांनी २०११ मध्ये पहिला कसोटी सामना वेस्ट इंडीज विरुद्ध खेळला. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले.

हे पण 🙏 वाचा 👉: अंडर १९ क्रिकेटपटू अथर्व अंकोलेकर यांची माहिती

२०१२ मध्ये कोहलीची भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी अनेकदा कर्णधार महेन्द्रसिंग धोनी च्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली.

धोनी यांची क्रिकेटमधून निवृत्ती झाल्यानंतर, २०१४ मध्ये कोहली हे भारतीय संघाचे कर्णधार झाले. कोहली यांचे फास्ट शतक, सर्वात फास्ट ५००० धावा आणि सर्वात फास्ट १० शतके असे बरेच विक्रम त्यांच्या नावावर आहेत.

सलग चार वर्ष सर्वात जास्त किमान १००० धावा करणारा जगातील दुसरा खेळाडू आहे. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात फास्ट १००० धावा पूर्ण करणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १६ अर्ध शतक पूर्ण करणारा एकमेव खेळाडू आहे.

विराट कोहली यांचे जीवनचरित्र – Virat Kohli Biography in Marathi

पूर्ण नाव विराट प्रेम कोहली
जन्म ५ नोव्हेंबर, १९८८
जन्मस्थान उत्तम नगर दिल्ली, भारत
वडिलांचे नाव प्रेम कोहली
आईचे नाव सरोज कोहली
भाऊ बहीण विकास, भावना
राष्ट्रीयत्व भारतीय
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
उंची ५ फु ९ इं (१.७५ मी)
पुरस्कार आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू २०१२
बीसीसीआय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पॉली उम्रीगर पुरस्कार : २०११-१२, २०१४-१५
अर्जुन पुरस्कार: २०१३
विराट कोहलीं याला 2018 मध्ये खेलरत्न पुरस्काकाराने गौरवण्यातआले

सुरुवातीचे जीवन/कुटुंब – Virat Kohli family, Mother, Father, Education life

विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहे.

त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे. त्यांच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.

कोहली यांचे बालपण उत्तम नगर दिल्ली या ठिकाणी गेले. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले.

जेव्हा १९९८ साली दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली. कोहली यांच्या वडिलांनी क्रिकेट अकॅडमि मध्ये त्यांचा प्रवेश घेतला, त्या वेळी कोहली यांनी राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

कोहली हे खेळा बरोबर अभ्यासही मन लावून करत होते, त्यांचे शिक्षक त्याला एक तेजस्वी आणि हुशार मुलगा’ समजत.

मेंदूच्या झटक्यामुळे कोहली यांच्या वडीलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतात कि,

” मी लहान असताना वडिलांचे निधन झाले, फॅमिली व्यवसाय पण व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. वडील माझे सर्वात मोठा आधार होते, ते नेहमी मला सरावासाठी घेऊन जात असत. अजूनही कधी कधी मला त्यांच्या सहवासाची आठवण होते.”

डिसेंबर महिन्यात झालेल्या वडलांच्या निधनानंतरही कर्नाटकविरुद्ध खेळले तेव्हा ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. त्या सामन्यात त्यांनी ९० धावा केल्या. ते बाद झाल्यानंतर लगेचच वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेले.

विक्रम आणि कामगिरी

सर्वात जलद शतक – भारतीय फलंदाजांमधील सर्वात जलद शतक (५२ चेंडूंत)

महत्त्वाचे टप्पे

1. सर्वात जलद १००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय भारतीय.

2. सर्वात जलद ४००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील तिसर्या क्रमांकाचा फलंदाज.

3. सर्वात जलद ५००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसर्या क्रमांकाचा फलंदाज.

4. सर्वात जलद ६००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसर्या क्रमांकाचा फलंदाज.

5. सर्वात जलद ७००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा फलंदाज.

6. सर्वात जलद १० एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील तिसर्या क्रमांकाचा फलंदाज.

7. सर्वात जलद १५ एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसर्या क्रमांकाचा फलंदाज.

हे पण 🙏 वाचा 👉: सौरभ गांगुली यांचे जीवनचरित्र

8. सर्वात जलद २० एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसर्या क्रमांकाचा फलंदाज.

9. सर्वात जलद २५ एकदिवसीय शतके करणारा फलंदाज.

10. सर्वात जलद १००० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० धावा पूर्ण करणारा फलंदाज.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा

२०१० मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.

२०११ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा.

२०१२ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.

२०१३ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.

२०१४ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.

२०१२ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.

२०१५ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.

२०१६ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.

एका आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा (९७३).

कर्णधार विक्रम – Captain record

कर्णधार म्हणून पहिल्या तीन कसोटी डावांत शतके करणारा पहिला क्रिकेटपटू.

परदेशात द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार.

दोन किंवा अधिक द्विशतके करणारा पहिला भारतीय कसोटी कर्णधार.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा कर्णधार.

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय व आशियाई कर्णधार

विराट कोहली यांचे विचार – Virat Kohli Quotes in marathi

जगातील कोणताही क्रिकेट संघ एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून राहू शकतो. संघ नेहमी जिंकण्यासाठी खेळतो.

क्रिकेटमुळे मी माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्कारास उशीरा पोहोचलो.

भारतीय क्रिकेट संघासाठी नेहमी चांगले काम करणे, हे माझे मुख्य लक्ष आहे.

दिल्ली ही माझ्यासाठी सर्वकाही आहे. या शहराने मला सर्व काही दिले आहे आणि त्यावर माझे प्रेम आहे.


अशा प्रकारे आज आपण विराट कोहली(Virat Kohli Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏


More info : Wiki

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र | Mahatma Gandhi Biography in Marathi

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र Mahatma Gandhi Biography in Marathi

Sonu Nigam Biography in Marathi - सोनू निगम यांचे जीवनचरित्र

Sonu Nigam Biography in Marathi – सोनू निगम यांचे जीवनचरित्र