in , , ,

Dhirubhai Ambani biography in Marathi – धीरुभाई अंबानी यांचे जीवनचरित्र

Dhirubhai Ambani biography in Marathi - धीरुभाई अंबानी यांचे जीवनचरित्र

Dhirubhai Ambani biography in Marathi – धीरुभाई अंबानी यांचे जीवनचरित्र

धीरजलाल हिराचंद अंबानी सर्वात ज्यास्त धीरूभाई अंबानी म्हणून ओळखले जातात. एक यशस्वी भारतीय उद्योजक होते. त्यांनी 1966 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज ची स्थापना केली.

त्यांची कामाबद्दल कष्ट आणि रुची पाहून प्रत्येक तरुण त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. त्यांच्याकडून आपल्याला एक शिकवण भेटते ती म्हणजे आपण कितीही कठीण परिस्थितीत असलो तरी स्वतःच्या बळावर यशस्वी होऊ शकतो.

पुरस्कारपद्म विभूषण २०१६

पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी
जन्म 28 डिसें. 1932.
जन्मस्थान जूनागढ गुजरात
मृत्यू 6 जुलै 2002, मुंबई, महाराष्ट्र, भारत
वडील हिराचंद अंबानी
आई जमनाबेन अंबानी
अपत्ये मुकेश अंबानी,
अनिल अंबानी,
नीना बी कोठारी,
दिप्ती डी साल्गाओकर
राष्ट्रीयत्व भारतीय
व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक

सुरुवातीचे जीवन – Early life

धीरूभाई अंबानी हे मोरा समाजातील गावचे शिक्षक आणि जमनाबेन अंबानी हिराचंद गोरधनभाई अंबानी यांचे एक पुत्र होते आणि त्यांचा जन्म गुजरातमधील जुनगड जिल्ह्यातील चोरवड येथे झाला होता.

धीरुभाईंनी कोकिलाशी लग्न केले आणि त्यांना चार मुलेही झाली; मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीना भद्रश्याम कोठारी आणि दिप्ती दत्तराज साळगावकर.

कारकीर्द – Career

धीरूभाई अंबानी यांनी काही थोड्याशा पैशाने कंपनी चालू केली होती ती पुढे जाऊन २०१२ पर्यंत ८५००० कर्मचारी काम करू लागले.

सेंट्रल गव्हरमेंट ला संपूर्ण टॅक्स पैकी ५% टॅक्स रिलायन्स कंपनी कडून येत होता.

बिलियन डॉलरची संपत्ती

२०१२ मध्ये सर्वात श्रीमंत कंपनीच्या यादीत रिलायन्स कंपनीचे नाव आले होते. अंबानी यांनी १९७७ मध्ये रिलायन्स कंपनीची स्थापना केली आणि ती २००७ मध्ये ६० बिलियन डॉलरची संपत्ती झाली.

१७ वर्षाच्या वयात धीरूभाई अंबानी हे येमेन देशामध्ये एका पेट्रोल पम्प कंपनी मध्ये काम करत होते, त्या अगोदर ते बर्माशेल कंपनी मध्ये नोकरी करत होते.

त्यांनी असा विचार केला कि एक दिवशी आपली स्वतःची पण कंपनी चालू करणार. हे त्यांचे स्वप्न होते. ते त्यांनी खरे करून दाखवले.

“रिलायन्स” ची स्थापना

जेव्हा ते १९५८ साली भारतात परत आले तेव्हा त्यांनी मुंबई येथे “रिलायन्स” ची स्थापना करून मसाले आणि वेगवेगळ्या वस्तू निर्यात करायला सुरुवात केली.

त्यांच्या लक्षात आले कि, कपड्याचा व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये चांगला धंदा होऊ शकतो. म्हणून त्यांनी अहमदाबाद जवळ नरोडा येथे कपड्याची मिल चालू केली. रिलायन्स च्या या मिल मध्ये पहिल्या वर्षी ९ करोड चा धंदा झाला.

रिलायन्स कंपनीने पुढे जाऊन पेट्रोकेमिकल्स, ऑईल रिफायनरी, दूरसंचार, वीज निर्मित, गॅस पाईप लाईन अश्या वेगवेगळ्या क्षेत्रा मध्ये गुंतवणूक केली.

धीरूभाई अंबानी यांनी दाखवून दिले कि, आपण भारतीय दुसऱ्या देशापेक्षा खूप काही करू शकतो. अश्या या महान व्यक्ती चे मुंबई येथे ६ जुलै २००२ मध्ये निधन झाले.

Dhirubhai Ambani Death – मृत्यु 

जून २४ इ.स. २००२ या दिवशी धीरूभाईंना मेंदूत रक्ताची गाठ झाल्यने पक्षाघाताचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले.

पण उपचारांना यश आले नाही. अखेर जुलै ६ इ.स. २००२ या दिवशी धीरूभाई अंबाणींचे निधन झाले. शेवटचे ११ दिवस ते कोमामध्ये होते.


More info : Wiki


तुम्हाला दिलेली धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani biography in Marathi) यांची माहिती आवडली असेल. हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद

स्वप्नील जोशी यांचे जीवनचरित्र - Swapnil Joshi Biography in Marathi

स्वप्नील जोशी यांचे जीवनचरित्र – Swapnil Joshi Biography in Marathi

लता मंगेशकर यांच्या विषयी माहिती - Lata Mangeshkar Biography in Marathi

Lata Mangeshkar biography in Marathi – लता मंगेशकरांचे जीवनचरित्र