in ,

डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम – Dr APJ Abdul Kalam information in Marathi Essay

शिक्षण – A P J Abdul Kalam education

कलाम यांना शाळेत जाण्याची आणि शिकण्याची तीव्र इच्छा होती. ते शाळेतले हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थी होते.

ते आपला पूर्ण वेळ अभ्यासाला देत होते. विषतत: ते गणितावर ज्यास्त भर देत असत.

हाइ स्कूल चे शिक्षण घेण्यासाठी ते रामनाथपुरम या ठिकाणी गेले, त्यांनी Schwartz Higher Secondary School या शाळेतून शिक्षण पूर्ण केले.

त्या शाळेत एक शिक्षक होते, आयदुराई सोलोमन, कलाम त्यांचा आवडता विध्यार्थी होते.

महाविद्यालयीन अभ्यास

१९५० मध्ये कलाम यांनी तिरुचिरापलीच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतले. त्यांनी त्या ठिकाणी बी एस सी डिग्री पूर्ण केली.

पण कलाम यांना माहित नव्हते कि, पुढचे शिक्षण घेतल्यानंतर काहीपण करता येईल. डिग्री पूर्ण झाल्या नंतर त्यांना कळले कि, फिजिक्स केमिस्ट्री हे विषय नाहीत.

त्यांनी नंतर इंजिनीरिंग ला प्रवेश घेतला.

कलाम यांचे इंजिनीरिंग चे शिक्षण – Engineering Education

कलाम यांनी एमआईटीमध्ये(Madras Institute of Technology) अभ्यास करून Entrance Exam पास केली, पण ऍडमिशन घेण्यासाठी १००० रुपये ची गरज होती, ती त्या काळात एक मोठी रक्कम होती.

त्या वेळी त्यांची बहीण जौहरा पुढे आली, आणि तिने आपला भाऊ कलाम च्या ऍडमिशन साठी सोने गहाण ठेवले आणि पैशांची व्यवस्था केली.

त्यावेळेस कलाम यांचा मिसाइल मॅन म्हणून जन्म झाला. त्यांनी एमआईटी मध्ये पुढील ३ वर्ष एयरोनॉटिकल इंजिनीरिंग (Aeronautical Engineering) चे शिक्षण पूर्ण केले.

कलाम वरिष्ठ वर्गाच्या प्रकल्पात काम करत असताना, डीन त्यांच्या प्रगतीअभावी असमाधानी होते आणि पुढील तीन दिवसांत प्रकल्प पूर्ण झाला नाही तर शिष्यवृत्ती रद्द करण्याची धमकी दिली.

कलाम यांनी डीनला प्रभावित करुन २४ तासाच्या आत प्रोजेक्ट पूर्ण करून दिला.

वैज्ञानिक जीवन – Career as a scientist

१९७२ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संघटनेत सामील झाले. प्रोजेक्ट डायरेक्टर जनरल म्हणून भारताचे पहिले स्वदेशी उपग्रह (SLV iii) क्षेपणास्त्र बनवण्याचे श्रेय अब्दुल कलाम यांना मिळाले.

त्यांनी छोट्या होवरक्राफ्टची रचना करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु डीआरडीओमध्ये नोकरी निवडल्यामुळे ते सहमत झाले नाहीत.

कलाम हे विक्रम साराभाई, प्रख्यात अवकाश वैज्ञानिक, यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या INCOSPAR समितीचे सदस्यही होते.

कलाम यांनी प्रोजेक्ट डेव्हिल आणि प्रोजेक्ट व्हॅलियंट या दोन प्रकल्पांचे दिग्दर्शनही केले.

१९८२ मध्ये ते भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत दिग्दर्शक म्हणून परत आले आणि त्यांनी आपले लक्ष “गाइडेड मिसाइल” च्या विकासावर केंद्रित केले.

अग्नि मिसाइल आणि पृथ्वी मिसाइल यशस्वी चाचणीचे श्रेय त्यांना जाते.

जुलै १९९२ मध्ये त्यांची भारतीय संरक्षण मंत्रालयात वैज्ञानिक सल्लागार म्हणून नेमणूक झाली.

त्यांच्या देखरेखीखाली भारताने १९९८ मध्ये पोखरण येथे दुसरी यशस्वी अणुचाचणी केली आणि परमाणु शक्ति असणाऱ्या देशांच्या यादीत त्यांचा समावेश झाला.

भारताचे राष्ट्रपती – President of India

जेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते, त्यांच्या काळात १८ जुलै २००२ रोजी कलाम यांना ९० टक्के बहुमताने भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि २५ जुलै २००२ रोजी संसद भवनच्या अशोक कक्षात राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

या संक्षिप्त सोहळ्यात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

त्यांचा कार्यकाळ २५ जुलै २००७ रोजी संपला.

कलाम यांनी असे म्हटले आहे की,

” 2000 वर्षों के इतिहास में भारत पर 600 वर्षों तक अन्य लोगों ने शासन किया है। यदि आप विकास चाहते हैं तो देश में शांति की स्थिति होना आवश्यक है और शांति की स्थापना शक्ति से होती है। इसी कारण प्रक्षेपास्त्रों को विकसित किया गया ताकि देश शक्ति सम्पन्न हो। “

Bhagat Singh information and Quotes in Marathi - भगतसिंग यांच्या जीवना विषयी माहिती

भगतसिंग यांच्या जीवना विषयी माहिती – Bhagat Singh information and Quotes in Marathi

दीपिका पादुकोण बायोग्राफी मराठीत - Deepika Padukone Biography in Marathi

दीपिका पादुकोण बायोग्राफी मराठीत – Deepika Padukone Biography in Marathi