in

Mukta Barve Biography, movies, age, net worth, husband wiki, brother, images, instagram, – मुक्ता बर्वे यांची माहिती

Mukta Barve Biography, movies, age, net worth, husband wiki, brother, images, instagram, - मुक्ता बर्वे यांची माहिती
image source : Muktabarvefan [CC BY-SA (https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0)]

Mukta Barve Biography, movies, age, net worth, husband wiki, brother, images, instagram, – मुक्ता बर्वे यांची माहिती

मुक्ता बर्वे एक भारतीय टेलिव्हिजन, चित्रपट आणि थिएटर अभिनेत्री आणि निर्माता आहे. बर्वे सर्वात लोकप्रिय मराठी सेलिब्रिटीपैकी एक आहेत.

त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ७ महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

त्यांना एक अभ्यासू, स्वतंत्र विचारांची आणि कष्टाळू अभिनेत्री म्हणून मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टींत ओळखले जाते.

त्यांच्या सहज अभिनयाने मुक्ता यांनी रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे.

टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणा‍‍‍र्‍या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.

मुक्ता बर्वे यांचे कुटुंब – Mukta Barve family, Brother, Born, Father, Mother info

पूर्ण नाव मुक्ता वसंत बर्वे
जन्म १७ मे, १९८१
जन्मस्थान सातारा, महाराष्ट्र, भारत
मूळ गाव चिंचवड, पुणे
वडिलांचे नाव वसंत बर्वे
आईचे नाव विजया बर्वे
भाऊ-बहीण देबू बर्वे

बर्वे यांचा जन्म १७ मे, १९८१ मध्ये पुण्याजवळील चिंचवड या ठिकाणी झाला. त्यांचे वडील श्री वसंत बर्वे हे एका टेल्को कंपनीत नोकरी करत होते आणि आई विजया बर्वे यांचा पेशा शिक्षिकेचा असून त्या नाट्यलेखिका पण होत्या.

देबू बर्वे हे मुक्त बर्वे यांचे मोठे बंधु, ते आर्टिस्ट आहेत आणि लहानपणी चित्रपटा मध्ये अभिनय केला आहे.

बर्वे यांना कलेचे संस्कार त्यांच्या आईकडून मिळाले, त्यांचा लाजाळू स्वभाव कमी व्हावा म्हणून आईने लिहिलेले बालनाट्य “रुसू नका फुगू नका” यामध्ये भित्रा ससा आणि परी राणी अश्या दुहेरी भूमिका वयाच्या चौथ्या वर्षी करायला दिल्या.

त्यानंतर दहावीची परीक्षा त्यांनी “घर तिघांचे हवे” या नाटकात भूमिका साकारली. नाटकाची ओढ़ लागल्याने त्यात करियर करायचे ठरवले.

Mukta Barve Biography movies age net worth

त्यांनी पुढील ११ आणि १२ वी चे शिक्षण सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे येथे घेतले. त्यानंतर ललित कला केंद्र , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नाट्य शास्त्र विषयात पदवी घेतली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या मुंबई मध्ये शिफ्ट झाल्या.

मुक्ता बर्वे यांची वैयक्तिक माहिती – Mukta Barve Boyfriend/Husband, Age, Height, occupation.

पतीचे नाव अद्याप माहिती मिळाली नाही
अपत्ये अद्याप माहिती मिळाली नाही
कार्यक्षेत्र अभिनेत्री, अभिनय, चित्रपट निर्मिती
प्रमुख नाटके देहभान, फायनल ड्रॅफ्ट, कबड्डी कबड्डी, छापा काटा, कोडमंत्र
प्रमुख चित्रपट जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई भाग १ आणि २, डबलसीट
प्रमुख टीव्ही कार्यक्रम एका लग्नाची दुसरी गोष्ट
केसांचा रंग काळा
भाषा मराठी भाषा,
धर्म
राष्ट्रीयत्व भारतीय

कारकीर्द – Mukta Barve Career

रंगभूमीवरील मुक्ताची सुरुवात बालपणापासून झाली. ‘रुसू नका फुगू नका’ आणि ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात लहानपणी भूमिका साकारल्या आहेत.

त्यांची १९९८ साली टीव्ही वरील पहिली मालिका “घडलंय बिघडलंय” होती.

त्यानंतर त्यांनी पिंपळपान (१९९८), बंधन (१९९८), बुवा आला (१९९९), चित्त चोर (१९९९), मी एक बंडू (१९९९), आभाळमाया (१९९९), श्रीयुत गंगाधर टिपरे (२००१) आणि इंद्रधनुष्य (२००३) या मालिकांमधून छोट्या मोट्या भूमिका साकारल्या.

२००४ साली, “चकवा” या चित्रपटातून मुक्ता यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

त्यांचा यशस्वी चित्रपट “जोगवा” त्यामुळे त्यांना चागले यश प्राप्त झाले.

“जोगवा” नंतर २०१० साली प्रदर्शित झालेल्या मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांचा मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटाने पुन्हा एकदा मुक्ताला घवघवीत यश मिळवून दिले.

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

स्वप्निल जोशी यांची माहिती

मुक्ता बर्वे यांच्या काही चित्रपटांची यादी – List of some of Mukta Barve’s films

चित्रपट वर्ष
सावर रे 2007
दे धक्का 2008
सास बहू और सेन्सेक्स 2008
एक डाव धोबीपछाड 2009
जोगवा 2009
मुंबई-पुणे-मुंबई 2010
बदाम राणी गुलाम चोर 2012
मंगलाष्टक वन्स मोअर 2013
शॉट 2014
डबलसीट 2015
मुंबई-पुणे-मुंबई २ 2015
गणवेश 2016
वाय.झेड 2016
हृदयांतर 2017
मुंबई पुणे मुंबई ३ 2018
बंदिशाळा 2019

मुक्ता बर्वे यांना मिळालेले पुरस्कार

अल्फा गौरव अवॉर्ड
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
मराठी फिल्मफेअर अवॉर्ड
उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार
आय.बी.एन. लोकमत या दूरचित्रवाणी वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार : २०१४
’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०

मुक्ता बर्वे यांची सोशल मीडियावर ओळख – Social Media Official Account

इंस्टाग्राम : https://www.instagram.com/muktabarve/?hl=en

फेसबुक : https://www.facebook.com/muktaforfans/

ट्विटर : https://twitter.com/muktabarve?lang=en


अशा प्रकारे आज आपण मुक्ता बर्वे(Mukta Barve Biography in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏


More info : Wiki

सुबोध भावे माहिती - Subodh Bhave Biography, Age, Family, Height in Marathi

सुबोध भावे माहिती – Subodh Bhave Biography, Age, Family, Height

श्री बाबामहाराज सातारकर यांची माहिती - Baba Maharaj satarkar information in Marathi

श्री बाबामहाराज सातारकर यांची माहिती – Baba Maharaj Satarkar information in Marathi