in

सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती – Sant Samarth Ramdas Swami information in Marathi

समर्थ रामदास स्वामी यांची माहिती Sant Samarth Ramdas information in Marathi

Sant Samarth Ramdas Swami information in Marathi – सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती

समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते आणि त्यांना महाराष्ट्राचे महान संत असे मानले जातात. समर्थ रामदास लहानपणापासूनच रामाची भक्ती करण्यामध्ये गुंतले होते. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात हिंदू धर्मचा प्रसार केला.

दक्षिण भारतात श्री राम भक्त हनुमानाचा अवतार म्हणून त्यांची उपासना केली जाते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. “दासबोध” हे त्यांचे मुख्य पुस्तक मराठी भाषेत लिहिलेले आहे.

समर्थ रामदासांचा समाधी दिवस “दास नवमी” म्हणून साजरा केला जातो.

त्यांनी तपश्चर्या आणि साधना वयाच्या १२ व्या वर्षांपासून चालू केली. स्वामी हे तब्बल १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. रामदास स्वामी यांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण केले.

ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत.

सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांचे प्रसिद्ध वचन खाली दिले आहे.

जय जय रघुवीर समर्थ

समर्थ रामदास स्वामी यांचे जीवनचरित्र – Samarth Ramdas Swami Biography, Wiki, Birth, Books, Life, Age, Education, Family, Death in Marathi

अंक (Points) माहिती (Information)
पूर्ण नाव (Name) नारायण सूर्याजीपंत ठोसर
अन्य नाव संत समर्थ रामदास स्वामी
जन्म (Born) २४ मार्च १६०८
जन्मस्थान (Birthplace) जांब, जालना जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू (Death) १३ जानेवारी १६८१
मृत्यूस्थान सज्जनगड, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
वडिलांचे नाव (Father Name) सूर्याजीपंत ठोसर
आईचे नाव (Mother Name) राणूबाई सूर्याजीपंत ठोसर.
कार्य भक्ति-शक्तीचा प्रसार,
जनजागृती,
समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना
भाषा मराठी
धर्म हिंदू

सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती – Samarth Ramdas Swami Personal Life Information in Marathi

समर्थ रामदास यांचा जन्म २४ मार्च १६०८ मध्ये राम नवमीच्या दिवशी महाराष्ट्रातील जालना या गावी ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यजीपंत आणि आईचे नाव राणूबाई असे होते.

समर्थ रामदास यांचे मूळ नाव ‘नारायण सूर्याजीपंत ठोसर’ होते. त्यांचे वडील सूर्यदेव यांचे उपासक होते. ब्राह्मण कुटुंबातील असल्याने वडिलांनी आपला बहुतेक वेळ पूजा आणि धार्मिक विधीमध्ये घालवला.

अशाप्रकारे, नारायण (समर्थ रामदास स्वामी) यांना हिंदू धर्माची शिकवण बालपणातच मिळाली. कुटुंबामध्ये वडील व मुलगा यांच्याव्यतिरिक्त आई राणूबाई आणि मोठा भाऊ गंगाधर देखील होते.

समर्थ रामदास स्वामी यांचे बालपण – Samarth Ramdas Childhood in marathi

नारायण (समर्थ रामदास स्वामी) लहान असताना खूप खोडकर होते. दिवसभर गावात झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत ते तरबेज होते.

एकदा त्यांच्या आईने त्याला फटकारले आणि म्हटले की “आपण दिवसभर फिरून खोड्या काढण्यापेक्षा, आपल्या मोठ्या भावाकडून काहीतरी शिका आणि काहीतरी काम करा”. आईची ही गोष्ट नारायणच्या मनाला लागली आणि दुसर्‍या दिवसापासून त्यांनी ध्यान साधना करण्यास सुरवात केली.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : राणी लक्ष्मीबाई यांची माहिती

दुसर्‍या दिवशी आई राणूबाई यांना घराच्या आसपास नारायण खेळताना दिसले नाहीत तेव्हा त्या अस्वस्थ झाल्या आणि आई व भाऊ गावात नारायण यांना शोधण्यासाठी गेले. दिवसभर शोध घेतल्यानंतरही नारायण सापडले नाही.

तेव्हा आई आणि भाऊ कंटाळलेल्या अवस्थेत घरी नारायण यांच्या खोलीत पोहचले, तेव्हा त्यांना ध्यानस्त बसलेले नारायण दिसले. आईने नारायण यांना विचारले “दिवसभर काय करीत होतास” असे विचारल्यावर “आई, चिंता करितो विश्वाची” असे उत्तर त्यांनी दिले होते.

त्या दिवसापासून नारायण यांची जीवनशैली पूर्णपणे बदलली. लोकांना आरोग्य आणि धर्म ज्ञान देण्यास त्यांनी सुरुवात केली. युवाशक्तीतूनच एक सशक्त राष्ट्र स्थापित करता येते, असे त्यांनी युवकांना सांगितले. त्यांनी विविध ठिकाणी व्यायामासाठी व्यायामशाळा उभारल्या आणि शाळेत हनुमानाची मूर्ति ठेवून नियतमीतपणे पूजा करण्याचा सल्ला दिला.

उर्वरीत माहिती पुढील पानावर वाचा…

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची माहिती Dr Rajendra Prasad information in Marathi

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची माहिती Dr Rajendra Prasad information in Marathi

Aaditya Thackeray Biography in Marathi

युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या विषयी माहिती – Aaditya Thackeray Biography in Marathi