in

Tanaji Malusare Marathi information Essay Nibandh Biography itihas – तानाजी मालुसरे यांचा इतिहास

Tanaji Malusare Marathi information Essay Nibandh Biography itihas - तानाजी मालुसरे यांचा इतिहास
image source Ankur P : https://www.flickr.com/photos/28747587@N00/787376098

Tanaji Malusare Marathi information Essay Nibandh Biography itihas – तानाजी मालुसरे यांचा इतिहास

तानाजी मालुसरे हे मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटचे मित्र आणि वीर मराठा सरदार होते. ते मराठा साम्राज्याचे सुभेदार आणि सेनापती होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह हिंदू स्वराज्यासाठी लढणारे सैन्य होते.

तानाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्रदेखील होते.

या भारताच्या भूमीवर अनेक शूर योद्धे जन्माला आले आहेत. भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप असे अनेक महान योद्धा होते, ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला, परंतु दुर्दैवाने आज आपण त्यांच्या पराक्रमाची गाथा विसरत चाललो आहे. त्या मध्ये एक शूर वीर योद्धा तानाजी मालुसरे होते.

मराठा साम्राज्याचे तानाजी एक सेनापती होते. आज जेव्हा जेव्हा मराठा साम्राज्याचा उल्लेख केला जातो, तेव्हा शिवाजी महाराजांचे नाव सर्वांसमोर येते.

पण महाराजांचे मित्र तानाजी ज्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी मुघलांच्या काळात सर्वात मोठे किल्ले जिंकले.

तानाजींच्या जीवनाचा थोडक्यात परिचय सांगितला तर ते मराठा कोळी सरदार होते.

शिवाजी महाराजांची लहानपणाची मैत्री आणि त्यांच्या कार्याबद्दलची भक्ती यासाठी तानाजी यांना ओळखले जाते.

तानाजी मालुसरे यांचे जीवन चरित्र – Tanaji Malusare Marathi information Essay Nibandh Biography itihas

संपूर्ण नाव  तानाजी मालुसरे
जन्म  १६२६
जन्मस्थान  जावळी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू  ४ फेब्रुवारी, १६७०
मृत्युस्थान  सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत
वडिलांचे नाव  कलोजी
आईचे नाव  पार्वतीबाई
पत्नी  सावित्रीबाई मालुसरे
अपत्ये  रायबा मालुसरे
धर्म  हिंदू

तानाजी मालुसरे यांचे प्रारंभिक जीवन – Life History of Tanaji Malusare in Marathi

शिवाजी महाराज यांचे सर्वात लहान मित्र आणि मराठा साम्राज्याचे सर्वात विश्वासू शूरवीर योद्धा तानाजी यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गोडवली (जावली तालुका) या छोट्या गावात १६२६ मध्ये झाला.

तानाजीचा जन्म हिंदू कोळी कुटुंबात झाला होता. तानाजीच्या वडिलांचे नाव सरदार कालोजी आणि आईचे नाव पार्वतीबाई होते.

तानाजीला लहानपणापासूनच तलवारबाजीची फार आवड होती. ह्याच कारणामुळे त्यांची मैत्री शिवाजी महाराज यांच्याशी झाली.

साम्राज्यातले तानाजी यांचे कौशल्य पाहून, शिवाजी महाराज यांनी आपल्या सैन्याचा सेनापती आणि मराठा साम्राज्याचा मुख्य सूबेदार म्हणून नेमले.

तानाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मैत्री – Friendship of Tanaji and Chhatrapati Shivaji Maharaj

तानाजी आणि छत्रपती शिवाजीराजे एकमेकांना चांगले ओळखत होते आणि लहानपणापासूनच त्यांचे मित्र होते. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक युद्धामध्ये तानाजी सहभाग घेत होते.

औरंगजेबाने शिवाजी महाराज व तानाजी यांना विश्वासघात करून अटक केली होती.

नंतर शिवाजी महाराज आणि तानाजी यांनी एक योजना तयार केली आणि मिठाईच्या बॉक्समध्ये लपून तेथून निघून गेले.

कोंढाणा किल्ला – Kondana Fort information

एकदा शिवाजी महाराजांची आई जिजाबाई लाल महालातून कोंडणा किल्ल्याकडे पहात होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मनातील गोष्ट विचारली. यावर आई जिजाबाई म्हणाल्या की, माझी अशी इच्छा आहे कि, कोंढाणा किल्ला आपल्याकडे आला पाहिजे.

दुसर्‍या दिवशी शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यसभेतील सर्व सैनिकांना बोलावून कोंडणा किल्ला जिंकण्यासाठी कोण तयार आहे हे विचारले.

त्यावेळेस कोणत्याही सरदार आणि किल्लेदाराने हे कार्य करण्याचे धाडस केले नाही, परंतु तानाजींनी हे आव्हान स्वीकारले आणि ते म्हणाले, “मी कोंढाणा किल्ला जिंकून आणेल”.

याबद्दल बरेच सिद्धांत आहेत. असे म्हणतात की त्यावेळी तानाजीचा मुलगा रायबा यांच्या लग्नाची तयारी होत होती.

Tanaji Malusare Marathi information Essay Nibandh Biography itihas – तानाजी मालुसरे यांचा इतिहास

तानाजी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना लग्नासाठी आमंत्रित करण्यासाठी राजवाड्यात पोहोचले तेव्हा त्यांना कळले की छत्रपती शिवाजी महाराज कोंढाणावर लढाईची तयारी करत होते., तेव्हा तानाजी म्हणाले की राजे मी कोंढाण्यावर आक्रमण करेन.

आपला मुलगा रायबाच्या लग्नासारख्या महत्त्वाच्या कार्याला महत्त्व न देता त्यांनी शिवाजी महाराजांच्या इच्छेचे पालन केले आणि कोंढाणा किल्ला जिंकणे हे अधिक महत्वाचे वाटले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात बरेच सरदार होते पण त्यांनी कोंढाणा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी वीर तानाजीची निवड केली आणि कोंढाणा किल्ला “स्वराज्यात” सामील झाला पण तानाजी युद्धात गंभीर जखमी झाले आणि शेवटी स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले.

छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी समजताच ते म्हणाले, “गड आला पण सिह गेला”.

कोंढाणा किल्ल्याची रचना अशी होती की त्यावर हल्ला करणे सोपे नव्हते. किल्ल्याच्या आत जाण्यासाठी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जावे लागेल याची त्यांना जाणीव होती. त्या वेळी शिवाजी महाराजांना हा किल्ला कोणत्याही परस्थितीत जिंकण्याची इच्छा होती. त्यावेळी सुमारे ५००० हजार पेक्षा ज्यास्त मुघल सैनिक गडावर पहारेकरी होते.

गडाची सुरक्षा उदयभान राठोड यांच्या हाती होती. उदयभान हे हिंदू शासक होते परंतु सत्तेच्या लालसामुळे ते मुघलांबरोबर काम करत होते.

उदयभान बद्दल एक प्रचलित कथा आहे की, तो एक प्रकारचा राक्षसच होता. दररोज २० शेर तांदूळ आणि २ मेंढ्या खाणे ही त्याच्यासाठी एक छोटी गोष्ट होती. उदयभानला ५ मुले होते आणि ती त्याच्यापेक्षा हि भयानक होती.

अशा परिस्थितीत कोंढाणा किल्ल्याचा फक्त एकच भाग असा होता की जिथून मराठा सैन्य सहजपणे किल्ल्यात प्रवेश करू शकत होता आणि तो भाग किल्ल्याच्या उंच डोंगरांचा पश्चिम भाग होता.

तानाजीच्या युक्तीनुसार किल्ल्याच्या आत घुसण्यासाठी घोरपडीच्या सहाय्याने त्यांनी पश्चिमेकडील डोंगरावर चढण्याचे ठरविले.

कोंढाणा किल्ल्याची लढाई – Battle of Kondhana Fort in Marathi

शेवटी कोंडाणा किल्ल्यावरील आक्रमणाचा दिवस ठरला. ४ फेब्रुवारी १६७० ची रात्र होती. तानाजी मालसुरेबरोबरच त्याचे भाऊ सूर्यजी आणि मामा (शेलार मामा) असे एकूण २३४२ सैनिकांसह कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी निघाले. तानाजीराव सशक्त आणि अत्यंत शक्तिशाली होते.

कोंढाणा किल्ला राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी होता आणि महाराजांना कब्जा करण्यासाठी ते फार महत्वाचे होते.

कोंढाणा किल्ल्यावर पोहचल्यावर तानाजी व २३४२ सैन्याने पश्चिमेकडून किल्ल्यात प्रवेश करण्याचे ठरवले.

तानाजीकडे एक घोरपड होती. हा असा जीव आहे की जर त्याने दगडाला घट्ट पकडून ठेवले तर त्याला हलवणे खूप जोखीमीचे काम आहे.

तानाजींनी घोरपडीला घट्ट दोरी बांधली आणि किल्ल्याच्या पश्चिमेच्या बुरुजावर फेकून दिली आणि त्याच्या मदतीने मावळे किल्यावर चढले.

या योजनेमुळे तानाजी व त्याचे बरेच साथीदार शांतपणे किल्ल्यावर चढले. कोंढाणा दरवाजा उघडल्यानंतर त्याने मोगलांवर हल्ला केला.

राजकुमार जयसिंग ने नियुक्त केलेल्या उदयभान राठोड यांच्याकडे कोंढाणा किल्ल्याचे नियंत्रण होते.

तानाजीने उदयभानच्या नेतृत्वात ५००० मुघल सैनिकांसोबत भयंकर युद्ध केले.

तानाजीने शूर सिंहाप्रमाणे युद्ध केले आणि शेवटी हा किल्ला जिंकला, पण या लढाईमध्ये तानाजी खूप जखमी झाले आणि डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला ठार मारून स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले.

महान पराक्रम दाखवून, तानाजींनी मुघलांच्या ताब्यातून कोंढाणा किल्ला आणि जवळचा परिसर आपल्या ताब्यात केला.

या युद्धाच्या वेळी, जेव्हा त्याची ढाल तुटली तेव्हा तानाजींनी आपल्या डोक्यावरचा फेटा आपल्या हातावर बांधून तलवारीचे वार त्यांच्या हातावर घेतले आणि एका हाताने त्यांनी तलवार चालविली.

वीर तानाजी यांच्या स्मरणार्थ स्मारक – Tanaji Monuments In Marathi

कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यातून सोडवल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या मित्राच्या स्मरणार्थ कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून “सिंहगड” केले आणि पुणे नगरच्या “वाकडेवाडी” असे नाव “नरवीर तानाजी वाडी” असे ठेवले.

तानाजींचे शौर्य पाहून शिवाजींनी त्यांच्या स्मृतीत महाराष्ट्रात त्यांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके उभारली.

भारत सरकारने तानजीचा सन्मान करत सिंहगड किल्ल्याचे चित्र असलेले १५० रुपयांचे टपाल तिकीटही जाहीर केले.

हिंदी चित्रपट “तानाजी – अनसंग वारियर” – Taanaji – The Unsung Warrior Hindi film

बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक काळातील चित्रपट बनवण्याचे एक वादळ चालू आहे.

तानाजी यांची जीवन गाथा पडद्यावर दाखवण्यासाठी “तानाजी – अनसंग वारियर” या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी हा ३डी थिएटरमध्ये आणि इतर सिनेमा ग्रहात प्रदर्शित झाला. महाराष्ट्रात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

या चित्रपटात तानाजी मालसुरेची भूमिका बॉलिवूड अभिनेता अजय देवगन यांनी साकारली. तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर या मराठी अभिनेता यांनी साकारली.

ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १७ व्या शतकातला आहे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे.


हे पण वाचा : शिवाजी महाराज यांची माहिती


More info : Wiki


तुम्हाला दिलेली तानाजी मालुसरे(Tanaji Malusare information in Marathi) यांची माहिती आवडली असेल.

हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद

Swami Vivekananda information in Marathi Essay Nibandh Biography Quotes - स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र

Swami Vivekananda information in Marathi Essay Nibandh Biography Quotes – स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र

Sant Tukaram Maharaj information in marathi - संत तुकाराम महाराजांची संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांची माहिती – Sant Tukaram Maharaj information in Marathi