in , ,

लोकमान्य टिळक यांची माहिती – Lokmanya Tilak information in Marathi

Lokmanya Tilak information in Marathi - लोकमान्य टिळक यांची माहिती
Public domain

Lokmanya Tilak information in Marathi – लोकमान्य टिळक यांची माहिती

बाल गंगाधर टिळक यांना आपण लोकमान्य टिळक या नावाने ओळखतो. त्यांचे जन्मनाव केशव आहे परंतु बाळ हे नाव पुढे रूढ झाले.

लोकमान्य टिळक हे एक भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक, थोर भारतीय नेते आणि वक्ते होते.

टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. लोकांनी स्वीकारलेले लोकांचे नेते म्हणून त्यांना “लोकमान्य” या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

महात्मा गांधींनी त्यांना “द मेकर ऑफ मॉडर्न इंडिया” म्हटले आहे.

✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: रमाई आंबेडकर यांची माहिती

सर व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या १९१५ साली प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात आपल्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात अब्रुनुकसानीची फिर्याद केली होती.

१९१९ च्या फेब्रुवारीत तिचा निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला. या खटल्यात टिळकांचे फार नुकसान झाले पण याच ग्रंथाने ‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’ भारतीय असंतोषाचे जनक, हे टिळकांचे गौरवास्पद अभिधान रूढ केले.

टिळक हे स्वराज्याचे पहिले व प्रबळ आणि भारतीय चेतनेतील एक कट्टरपंथी समर्थक होते. त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य आपण सर्वांना माहित आहे, ते असे आहे कि,

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.”

त्यांनी बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरविंद घोष, व्ही. चिदंबरम पिल्ले आणि मोहम्मद अली जिना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय नेत्यांशी जवळून युती केली.

Lokmanya Tilak Biography in Marathi – लोकमान्य टिळक यांची थोडक्यात माहिती

संपूर्ण नाव (Full Name) बाळ(केशव) गंगाधर टिळक
अन्य नाव लोकमान्य टिळक
जन्म (Born) २३ जुलै १८५६
जन्मस्थान  रत्‍नागिरी(टिळक आळी), रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू  १ ऑगस्ट १९२०
मृत्युस्थान  पुणे, महाराष्ट्र, भारत
वडिलांचे नाव (Father) गंगाधर रामचंद्र टिळक
आईचे नाव  पार्वतीबाई टिळक
पतीचे नाव (Husband)  सत्यभामाबाई
अपत्ये:  श्रीधर

लोकमान्य टिळक जन्म, कौटुंबिक आणि प्रारंभिक जीवन – Lokmanya Tilak Family, Life, Born, father, family, wife

केशव गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथील चिखलगाव या एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी आहे.

त्यांचे वडील, गंगाधर टिळक हे मराठी शालेय शिक्षक होते. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई.

गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले.

बाळ गंगाधऱ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. टिळक हे १६ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्यांनी पुण्यात राहूनच १८७२ मध्ये मॅट्रिक झाले.

१८७१ मध्ये वडिलांच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी, जेव्हा ते १६ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील तापीबाई यांच्याशी विवाह केला.

लग्नानंतर तापीबाई यांचे नाव सत्यभामाबाई असे ठेवण्यात आले. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते.

१८७७ मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणितातील प्रथम श्रेणीत बी.ए. विषय घेतला. एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल्एल्.बी. ही पदवी घेतली.

१९७९ मध्ये त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून एल.एल.बी. शिक्षण घेतल्यानंतर टिळकांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणिताचे अध्यापन करण्यास सुरवात केली. त्या नंतर ते पत्रकार झाले.

Lokmanya Tilak Marathi Mahiti – लोकमान्य टिळक यांची संघटना, चळवळ थोडक्यात माहिती

कार्यक्षेत्र  लेखक, साहित्यिक
भाषा मराठी
चळवळ  भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना  अखिल भारतीय काँग्रेस
प्रभाव शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप
प्रभावित महात्मा गांधी, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर
धर्म  हिंदू

उर्वरित माहिती पुढील पानावर वाचा…

डेक्कन कॉलेजमध्येच टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. याच सुमारास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेने त्यांनी गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाल नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासह काही महाविद्यालयीन मित्रांसह १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली.

सायली जाधव यांची माहिती मराठीत - Sayali Sunil Jadhav Biography in Marathi

सायली जाधव यांची मराठीत माहिती – Sayali Jadhav Biography in Marathi

अंकुश चौधरी यांची माहिती - Ankush Choudhary Biography, Age, Family, information in Marathi

अंकुश चौधरी यांची माहिती – Ankush Choudhary information in Marathi