in , ,

Narendra Modi biography in Marathi – नरेंद्र मोदींचे जीवनचरित्र

Narendra Modi biography in Marathi - नरेंद्र मोदींचे जीवनचरित्र
Source : https://commons.wikimedia.org/wiki/File:Shri_Narendra_Modi.jpg

Narendra Modi Biography in Marathi – नरेंद्र मोदीं यांचे जीवनचरित्र

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे 14 वे पंतप्रधान आणि वाराणसीचे खासदार आहेत. ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर जन्मलेले भारताचे पाहिले पंतप्रधान आहेत. ते ७ ऑक्टोबर २००१ ते २२ मे २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी हे भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे सदस्य आहेत.

वडनगरमधील गुजराती तेली कुटुंबात जन्मलेल्या मोदींनी त्यांच्या वडिलांना बालपणात चहा विकण्यास मदत केली आणि नंतर त्यांनी स्वत: ची स्टॉल चालविली. वयाच्या आठव्या वर्षी ते आरएसएसमध्ये सामील झाले, ज्यांच्याशी ते दीर्घकाळ संबंधित होते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच नरेंद्र मोदी हे एक राजकारणी आणि कवी आहेत. गुजराती भाषेव्यतिरिक्त ते देशभक्तीने हिंदीमध्येही कविता लिहितात.

Narendra Modi Short Biography in Marathi – नरेंद्र मोदीं थोडक्यात माहिती

पूर्ण नाव नरेन्द्र दामोदरदास मोदी
जन्म १७ सप्टेंबर १९५०
जन्मस्थान वडनगर, जि. मेहसाना (गुजरात).
वडील दामोदरदास मूलचंद मोदी
आई हीराबेन मोदी
पत्नी जसोदाबेन
शैक्षणिक मान्यता दिल्ली विद्यापीठ,
गुजरात विद्यापीठ
धर्म हिंदू
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा गुजराती, हिंदी, इंग्लिश,
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

आरंभिक जीवन आणि कुटुंब – Narendra Modi life

नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 साली वडनगर येथे महिसाना जिल्हा पंसारी कुटुंबात झाला. दामोदरदास मुल्चंद आणि हिराबेन मोदी यांच्या 6 मुलांमध्ये नरेंद्र मोदी हे तिसरे होते.

मुलाच्या नात्याने नरेंद्र मोदी हे वडनगर रेल्वे स्टेशनवर त्याच्या वडिलांच्या टपरीमध्ये चहा विक्री करण्यासाठी मदत करत होते, आणि काही काळानंतर त्यांच्या भावा बरोबर स्वत: चा चहाचा स्टॉल सुरु केला.

त्यांनी 1967 साली वडनगरमधून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले, नरेंद्र मोदींच्या शिक्षकाने सांगितले की ते एक साधा विद्यार्थी होता आणि भाषण करण्यात चांगले होते. त्यामुळे शिक्षकांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.

जेव्हा नरेंद्र मोदी नाटकात भाग घेत होते. तेव्हा ते त्यांचा जीवनाच्या कामा पेक्षा मोटी भूमिका घेत असत. आणि त्याचा प्रभाव त्यांच्या राजकीय जीवनावर पडला. नरेंद्र मोदी यांनी 8 वर्षाच्या वयात RSS च्या शाखेत जाणे येणे चालू केले.

तेथे त्यांची लक्ष्मणराव इनामदार यांच्याशी ओळख झाली. त्यांनी नरेंद्र मोदींची RSS मध्ये बालस्वयमसेवक म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी नरेंद्र मोदींना राजकारणामध्ये मार्गदर्शन केले.

राजकीय कारकीर्द – Narendra Modi Political career

नरेंद्र मोदी यांनी १९७१ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये समावेश झाल्यावर त्यांनी राजकारणामध्ये झोकून दिले. १९७५-७७ साली राजकीय मारा मारी चालू होती. तेव्हा पंत प्रधान इंदिरा गांधी होती.

यांनी RSS सारख्या संघटना बंद करण्यास सांगितल्या. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी एक पुस्तक लिहिले “संघर्ष माँ गुजरात”, त्यामध्ये गुजरात मधील राजकारण लिहिले.

१९७८ मध्ये नरेंद्र मोदी यांनी राज्यशास्त्र आणि गुजरात च्या युनिव्हर्सिटी मध्ये मास्टर डिग्री १९८३ मध्ये पूर्ण केली. १९८७ मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये नरेंद्र मोदी सहभागी झाले. भाजपाच्या काळात त्यानी समाजा साठी अनेक कामे केली.

त्यांनी छोट्या बिझनेस ला प्रोत्साहन दिले. १९९५ मध्ये राष्ट्रीय मंत्री स्वरूपात नरेंद्र मोदी यांची नियुक्ती झाली.

फेब्रुवारी 2002 मध्ये, जेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री म्हणुन काम करत होते. तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे वर कोणी अज्ञात लोकांनी हल्ला केला. खूप वादावाद होत होती. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारने कर्फ्यू जाहीर केली.

काही काळानंतर दोन्ही समुदायांमध्ये शांतता आली आणि त्यानंतर नरेंद्र मोदी सरकारवर अने`क लोकांनी संपूर्ण देशात टीका केली की या हल्ल्यात 1000 पेक्षा जास्त मुसलमान मारले गेले.

नरेंद्र मोदींविरोधात दोन चौकशी समित्या स्थापन केल्या पण सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध कोणीही साक्षीदार नसल्या कारणाने त्यांच्यावर गुन्हा चढवू शकले नाहीत.

त्यानंतर 2007 आणि 2012 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. आणि तेव्हापासून नरेंद्र मोदींनी आर्थिक विकासाकडे अधिक लक्ष देण्यास प्रारंभ केला. मोदींना गुजरातच्या विकासाचा आणि प्रगतीचा श्रेय अजूनही दिला जातो.

आज, त्यांचे हे गुजरात संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांनी गुजरात मध्ये उद्योग धंदा खूप वाढवला.

जून 2013 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले होते. जिथे बरेच लोक आधीच त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून गृहित धरले होते. लोकसभा निवडणुकीत 534 पैकी 282 जागा मिळवल्या.

यासह, त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा पराभव केला, जो गेल्या 60 वर्षांपासून भारतीय राजकारणात आहे. भारतीय जनतेने सुद्धा मोदींना जिकून दिले.

2014 च्या सुप्रसिद्ध नारा: अबकी बार मोदी सरकार ; अच्छे दिन आने वाले है!

पुरस्कार आणि मान्यता – Narendra Modi Awards and Recognitions

फेब्रुवारी २०१९ सियोल शांती पुरस्कार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी दक्षिण कोरियामध्ये सियोल शांति पुरस्कार २०१८ जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारा तो पहिला भारतीय आणि चौदावा व्यक्ती आहे.

एप्रिल २०१६ मध्ये नरेंद्र मोदी यांना सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑर्डर ऑफ अब्दुलाज़ीझ अल सौद‘(The Order of Abdulaziz Al Saud) देण्यात आला आहे.

जून २०१६ मध्ये अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अमीर अमानुल्ला खान पुरस्कार देऊन गौरविले.

सप्टेंबर २०१८ ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड‘ – आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि देशाला एकेरी प्लास्टिकपासून मुक्त करण्याचा निर्धार यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान देण्यात आला.

४ एप्रिल २०१९: संयुक्त अरब अमीरातने ‘ऑर्डर ऑफ जयद’ नावाचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.

१२ एप्रिल, २०१९: रशियाने त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘सेंट ऐण्ड्रू ऑर्डर‘ प्रदान केला


More info : Wiki


तुम्हाला दिलेली नरेंद्र मोदीं यांची माहिती आवडली असेल. हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद

लता मंगेशकर यांच्या विषयी माहिती - Lata Mangeshkar Biography in Marathi

Lata Mangeshkar biography in Marathi – लता मंगेशकरांचे जीवनचरित्र

Biography of Akash Thosar in Marathi - आकाश ठोसर यांचे जीवनचरित्र

Biography of Akash Thosar in Marathi – आकाश ठोसर यांचे जीवनचरित्र