in

राज ठाकरेसाहेब बायोग्राफी मराठी – Raj Thackeray Biography in Marathi

उत्तरप्रदेशी व बिहारी लोकांवरील टीका-

२००८ मध्ये मुंबई मध्ये येणाऱ्या उत्तरप्रदेशी व बिहारी लोकांवर टीका केली, त्यांचे असे म्हणणे होते की, त्यांच्या राजकारण्यांमुळे त्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही. त्यामुळे तेथील सर्व नागरिक भारतभर रोजगार शोधात फिरतात.

त्यातील सर्वात जास्त लोक हे मुंबईत येतात. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भ‍रावा? असा सवाल करत तेथील राजकारण्यांवर टीका केली.

दुकानावरील मराठी पाट्या

जुलै २००८ मध्ये ठाकरे साहेबांनी सार्वजनिक इशारा दिला की, मुंबईतील दुकानांमध्ये सध्या असलेल्या इंग्रजी नावाचा साइनबोर्ड व्यतिरिक्त मराठी नावाचा साइनबोर्ड असणे आवश्यक आहे.

यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भात कायदा केला होता, परंतु त्याची अंमलबजावणी केली गेली नव्हती.

त्यानंतर इशारा देऊन सुद्धा काही दुकानदारांनी दुकानाचे नाव मराठी मध्ये केले नाही, त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हडताळ चालू केली. त्यानंतर बहुतेक दुकान मालकांनी कायद्याचे पालन केले.

महाराष्ट्रातील टेलिकॉम कंपन्या

महाराष्ट्रातील टेलिकॉम कंपन्या फक्त इंग्रजी व हिंदी भाषेत ग्राहकांना सेवा देत होत्या.

त्यामुळे राज साहेबानी त्या कंपन्यांना इशारा दिला की, महाराष्ट्रात सेवा देत असलेल्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी मराठीतही सेवा देण्यास सुरूवात करावी.

या मागणीनंतर सर्व दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या ग्राहक सेवेत मराठीला अतिरिक्त पर्याय म्हणून ओळख करून दिली.

जनतेसाठी चांगली कामे

राज ठाकरे साहेब यांनी नेहमीच जनतेसाठी चांगली कामे केली, म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांचे प्रचारसभेत मुद्दे हे नेहमीच विकासाचे असतात.

भारतातील सर्वात सुंदर असा विकासाचा आराखडा निर्माण करण्याचे कामही त्यांच्याच नावावर नमूद आहे.

त्यांच्या महाराष्ट्राच्या ब्लु प्रिंटमधील अनंत निर्णय मोदी सरकारने आस्तित्वात आणले व त्यावर कामही सुरु केले आहे.

जेट एअरवेजमधून जेव्हा अनेक मराठी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले तेव्हा हे सगळे कामगार राज ठाकरे यांना भेटले व राज ठाकरेंनी पुन्हा त्या कामगारांना कामावर रुजू करून घ्यायला लावले.

रेल्वे भरतीतील परप्रांतीय आंदोलन तर राज ठाकरेंच्या यशस्वी आंदोलनांपकी एक आहे.या आंदोलनामुळे महाराष्ट्र रेल्वेत अनेक तरुणांना नोकरी मिळाली.

राज ठाकरे साहेब यांच्यावरील पुस्तके

मराठी मनाचा राजा (लेखक – मनोज आवाळे)

ही राजभाषा असे (राज ठाकरे यांच्या निवडक भाषणांचा हा संग्रह, संपादक – ज्ञानेश महाराव आणि प्रवीण टोकेकर).

मुक्त पत्रकार कीर्तिकुमार शिंदे यांनी संपादित केलेले ‘दगलबाज राज’ हे पुस्तक

ठाकरे विरुद्ध ठाकरे : उद्धव, राज आणि त्यांच्या सेनांच्या सावल्या (मूळ इंग्रजी लेखक -धवल कुलकर्णी, मराठी भा़षांतर – डॉ. सदानंद बोरसे , शिरीष सहस्रबुद्धे)

अधिकृत सोशल मीडिया खाते – Official Social media account

ट्विटर : https://twitter.com/rajthackeray/
फेसबुक : https://www.facebook.com/RajThackeray/


More info : Wiki


तुम्हाला दिलेली राज ठाकरे साहेब(Raj Thackeray Biography in Marathi) यांची माहिती आवडली असेल.

हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद

दीपिका पादुकोण बायोग्राफी मराठीत - Deepika Padukone Biography in Marathi

दीपिका पादुकोण बायोग्राफी मराठीत – Deepika Padukone Biography in Marathi

राजा बिरबल यांची माहिती - King Birbal information in marathi

राजा बिरबल यांची माहिती – King Birbal information in Marathi