in , ,

राजीव गांधी यांची माहिती – Rajiv Gandhi Biography in Marathi

राजीव गांधी यांची माहिती - Rajiv Gandhi information in Marathi
img source : Santosh Kumar Shukla / CC BY-SA (https://creativecommons.org/licenses/by-sa/2.0)

Rajiv Gandhi Biography in Marathi – राजीव गांधी यांची माहिती

राजीव गांधी अशी व्यक्ती होती कि ज्यांना वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी देशाचे पंतप्रधान होण्याचा मान आहे. ते देशातील सर्वात तरुण पंतप्रधान होते, ज्यांनी १९८४ मध्ये त्यांची आई इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदी प्रचंड बहुमताने स्थान मिळवले.

राजीव गांधी हे एक अतिशय साधे, सौम्य, शांत आणि संयमी राजकारणी होते ज्यांनी देशाच्या विकास आणि प्रगतीमध्ये आपले अमूल्य योगदान दिले आणि तरुणांना पुढे जाण्यासाठी त्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

१९९१ मध्ये तामिळनाडूमधील श्रीपेरुमबुदूर येथे झालेल्या भयंकर बॉम्बस्फोटातील कट रचल्याच्या अंतर्गत सार्वत्रिक निवडणुकीत त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत.

१९९१ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : राणी लक्ष्मीबाई यांची माहिती

आज आपण राजीव गांधी यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म(Born) कुठे झाला? त्यांचे कुटुंब(Family)? त्यांचे शिक्षण(Education)? या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील.

राजीव गांधी यांचे जीवनचरित्र – Rajiv Gandhi information in Marathi(Biography, Life, Age, Education, Family, House, Awards)

अंक (Points) माहिती (Information)
पूर्ण नाव (Name) राजीव गांधी
अन्य नाव
जन्म (Born) २० ऑगस्ट १९४४
जन्मस्थान (Birthplace) मुंबई, भारत,
मृत्यू (Death) २१ मे १९९१
मृत्यूस्थान श्रीपेरुमबुदूर,तमिळनाडू, भारत
वडिलांचे नाव (Father Name) फिरोज जहांगीर गांधी
आईचे नाव (Mother Name) इंदिरा गांधी
भाऊ-बहीण संजय गांधी
पत्नीचे नाव (Wife Name) सोनिया गांधी
अपत्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी

सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती – Rajiv Gandhi Personal Life Information in Marathi

राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबई येथे झाला. त्यांची आई इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांचे वडील फिरोज गांधी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रमुख आणि नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राचे संपादक होते.

१९६० मध्ये फिरोज गांधींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

राजीव गांधी यांचे प्रारंभिक शिक्षण – Rajiv Gandhi Education in Marathi

देशाचे नवीन पंतप्रधान राजीव गांधीजी, ज्यांनी देशाला प्रगतीच्या नव्या पातळीवर नेले होते, त्यांचे प्रारंभिक शिक्षण देहरादूनच्या शिव निकेतन व वेलम बॉईज स्कूलमधून झाले.

यानंतर अभ्यासामध्ये हुशार असणारे राजीव गांधीजी यांना देहरादूनमधील दून स्कूलमध्ये दाखल केले.

✍🏻 हे पण 🙏👉 वाचा : स्वातंत्र्यासाठी लढणारे महात्मा गांधी यांची माहिती

शालेय शिक्षण संपल्यानंतर ते पुढील अभ्यासांसाठी लंडनला गेले आणि तेथे त्यांनी सुप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले. यानंतर राजीव गांधी १९६६ मध्ये भारतात परतले.

त्या काळात त्यांची आई इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. यानंतर राजीव गांधी हे भारतीय एअरलाइन्समध्ये पायलट म्हणून रुजू झाले.

राजीव गांधी यांचा विवाह – Rajiv Gandhi Marriage life in Marathi

लंडनमध्ये शिकत असताना राजीव गांधींनी इटलीमध्ये राहणार्‍या अँटोनिया मिनो (सोनिया गांधी) यांची भेट घेतली आणि त्यानंतर दोघांनी १९६८ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भारतात येऊन त्या दोघांनी विवाह केला.

लग्नानंतर त्यांची पत्नी अँटोनिया मिनो यांनी त्यांचे नाव बदलून सोनिया गांधी केले, त्याही आज राजकारणाच्या उच्च पदावर कार्यरत आहेत.

लग्नानंतर त्यांना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ही दोन मुलं झाली. दोघेही आज कॉंग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.

उर्वरीत माहिती पुढील पानावर वाचा…

Aaditya Thackeray Biography in Marathi

युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या विषयी माहिती – Aaditya Thackeray Biography in Marathi

Dr Amol Kolhe Biography in Marathi – डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती