in

Ramabai Ambedkar Biography Husband Born Father – रमाई आंबेडकर यांची माहिती

रमाई यांचे कष्टमय जीवन

माता रमाई यांना जीवनात खूप दुःख सहन करावे लागले. मात्र रमाई यांनी कधी आपल्या दु:खाची झळ बाबासाहेबांना पोहचू दिली नाही.

१९२३ साली बाबासाहेब जेव्हा शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले, त्यावेळी रमाई यांचे खूप हाल झाले आणि त्यात दुष्काळ ही होता. त्यांचे हे हाल पाहून बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी काही पैसे देऊ केले.

त्यांनी त्यांच्या भावनांचा आदर केला पण पैसे काही घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती.

रमाई म्हणजेच त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान, मृत्युसत्र दुःख. रमाई यांनी अनेक मरणे पाहिली. लहान असताना कळत नव्हते मरण म्हणजे काय, त्या लहान वयात त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू.

त्यानंतर १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांसाहेबांची सावत्र आई जिजाबाई यांचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू. त्यानंतर १९२१ मध्ये बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू रमाई यांनी पाहिला.

बाबासाहेबांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही.

बाबासाहेबांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांना कळविले नाही. बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात गेले, त्यामुळे रमाई एकट्या पडल्या, घर चालवण्यासाठी त्यांनी शेण, गोवर्‍या, सरपणासाठी वणवण फिरल्या.

बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्‍या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत.

अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले.

अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागले.

त्याच वेळी रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.

रमाई नाव कसे पडले.

जेव्हा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते, तेव्हा त्यांनी रमाईला धारवाड मध्ये वराळे काकाकडे राहण्यास पाठिवले.

वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत होते. वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत होती.

एकदा अचानक दोन दिवस मिले खेळाला आली नाहीत. म्हणून रमाई यांनी काकांना विचारले, तेव्हा काका म्हणाले कि, वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील.

उर्वरित भाग पुढील पानावर वाचा…

Jayshree Gadkar Biography Son Age Movie Husband in Marathi

Jayshree Gadkar Biography Son Age Movie Husband in Marathi – जयश्री गडकर यांची माहिती

Pankaja Munde Biography in Marathi | Son | Age | Husband - पंकजाताई मुंडे यांची माहिती

Pankaja Munde Biography in Marathi | Son | Age | Husband | पंकजाताई मुंडे