in

Pankaja Munde Biography in Marathi | Son | Age | Husband | पंकजाताई मुंडे

Pankaja Munde Biography in Marathi | Son | Age | Husband - पंकजाताई मुंडे यांची माहिती

Pankaja Munde Biography in Marathi | Son | Age | Husband – पंकजाताई मुंडे यांची माहिती

बीड मध्ये जन्माला आलेल्या पंकजाताई मुंडे यांची ओळख फक्त बीड पुरतीच मर्यादित नसून तर पूर्ण महाराष्ट्र, भारत आणि परदेशातही त्यांना ओळखले जाते.

त्या महाराष्ट्र राज्यातील एक राजकारणी आहेत. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे साहेब हे १९९० च्या दशकात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पंकजाताई मुंडे ह्या ग्रामीण व महिला, बालविकास मंत्री होत्या. साखर कारखाना आणि बँक क्षेत्रात त्यांना ‘बिझिनेस वुमन’ म्हणून ओळखले जाते.

✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 : अजितदादा पवार यांच्या जीवनाविषयी माहिती

२०१७ मध्ये त्यांना ‘द पॉवरफुल पॉलिटिशियन’ म्हणून पुरस्कार मिळाला.

त्यांचा आवडता सुविचार

छोटे मन से कोई बड़ा नहीं होता। तुटे मन से कोई खड़ा नहीं होता।

पंकजाताई मुंडे यांचे जीवनचरित्र – Pankaja Munde Born, Husband, Mother name, Father Name short info

पूर्ण नाव (Name) पंकजा गोपीनाथ मुंडे
जन्म(Born) २६ जुलै १९७९
जन्मस्थान(Birthplace) परळी, बीड, महाराष्ट्र, भारत
मूळ गाव परळी
वडिलांचे नाव गोपीनाथ मुंडे
आईचे नाव प्रज्ञा मुंडे
भाऊ-बहीण प्रीतम मुंडे, यशश्री
पतीचे नाव(Husband Name) अमित पालवे
अपत्ये आर्यमान

सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती – Pankaja Munde Personal Life Information

पंकजाताई मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ रोजी परळी, तालुका परळी, जिल्हा-बीड महाराष्ट्रात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपीनाथ मुंडे आणि आईचे नाव प्रज्ञा मुंडे आहे.

त्यांना दोन लहान भावंडे प्रितम आणि यशश्री आहेत. त्यांनी कॉलेज डिग्री आणि एमबीए देखील केली आहे.

प्रमोद महाजन यांची भाची असून राहुल महाजन आणि पूनम महाजन यांची चुलत बहीण भाऊ आहेत.

✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 : शरद पवार साहेब यांची माहिती

पंकजाताई मुंडे यांचे लग्न अमित पालवे यांच्याशी झाले आहे. त्यांना एक मुलगा आहे त्यांचे नाव आर्यमान आहे.

त्यांना वाचायला आणि प्रवास करायला खूप आवडते, तसेच त्यांचे “शोले” आणि “दिल चाहता है” हे आवडते चित्रपट आहेत.

राजकीय कारकीर्द, त्यांचे कारक्षेत्र – Pankaja Munde Political career

कार्यक्षेत्र राजकारणी
प्रराजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
मतदारसंघ परळी विधानसभा मतदारसंघ
मंत्री पद ग्रामीण विकास ,
बाल और महिला विकास
भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश
पुरस्कार द पॉवरफुल पॉलिटिशियन
धर्म हिंदू
राष्ट्रीयत्व भारतीय

राजकीय कारकीर्द – Pankaja Munde Political career

सुरुवातील पंकजाताई मुंडे यांनी २०१२ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

२००९ मध्ये त्या परळी मतदार संघातून महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आल्या. त्यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांना ग्रामविकास, महिला व बालकल्याण खाते देण्यात आले.

त्यांच्या “पुन्हा संघर्ष यात्रा” ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी पंकजाताई मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना ताई यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळावे अशी अपेक्षा होती. पण पंकजाताई यांनी हे पद मिळावे अशी कधी आकांक्षा बाळगली नाही.

पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथे त्यांच्या वडिलांचे आणि भाजपाचे ज्येष्ठ लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधले आहे.

✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 : राज ठाकरेसाहेब बायोग्राफी मराठी

२०१४ मध्ये झालेल्या रोड अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर “गोपीनाथ गड” या नावाचा २० फूट उंच पुतळा बांधण्यात आला. ते स्मारक वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर आहे.

‘गोपीनाथ गड’ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, दुष्काळ निवारण, कौशल्य विकास, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि असे अनेक उपक्रम राबविण्यास ताई यांनी सुरूवात केली.

पंकजाताई मुंडे यांची सोशल मीडियावर ओळख – Social Media Official Account

इंस्टाग्राम : https://www.instagram.com/pankaja_gopinath_munde/?hl=en

फेसबुक : https://www.facebook.com/PankajaGopinathMunde/

ट्विटर : https://twitter.com/Pankajamunde/

पुरस्कार – Pankaja Munde Awards and Recognitions

२०१७ मध्ये त्यांना ‘द पॉवरफुल पॉलिटिशियन’ म्हणून पुरस्कार मिळाला.


अशा प्रकारे आज आपण पंकजाताई मुंडे(Pankaja Munde Biography, Son, Age, Husband in Marathi) यांच्या बद्दल माहिती घेतली.

हि माहिती तुमच्या मित्र मैत्रीणीना फेसबुक वर पुढे शेयर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली. ते कमेंट करा. धन्यवाद MarathiBiography.com 🙏🙏🙏


More info : Wiki :Pankaja Munde Biography in Marathi | Son | Age | Husband – पंकजाताई मुंडे यांची माहिती

Ramabai Ambedkar Biography in Marathi | Husband | Born | Father | Mother - रमाबाई आंबेडकर यांची माहिती

Ramabai Ambedkar Biography Husband Born Father – रमाई आंबेडकर यांची माहिती

Mahatma Jyotiba Phule information in Marathi - महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती

महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती – Mahatma Jyotiba Phule information in Marathi