in

राज ठाकरेसाहेब बायोग्राफी मराठी – Raj Thackeray Biography in Marathi

राज ठाकरे साहेब बायोग्राफी मराठी - Raj Thackeray Biography in Marathi
img source : Bollywood Hungama [CC BY (https://creativecommons.org/licenses/by/3.0)]

राज ठाकरेसाहेब बायोग्राफी मराठी – Raj Thackeray Biography in Marathi

राज साहेबांच्या भाषणांमुळे ते तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत.

महाराष्ट्रातील सर्व नेत्यांपैकी त्यांचे नाव गूगल(Google) वर सर्वात ज्यास्त वेळा सर्च केले जाते. म्हणजेच इंटरनेटच्या विश्वातही राज साहेबांचा चांगलाच दबदबा आहे.

राज ठाकरे साहेब हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत; आणि शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे चुलत भाऊ आहेत.

राज साहेबांचे खूप मोठे असे ध्येय आहे, त्यांचे ब्रीदवाक्य खाली दिले आहे.

“जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचाय”

राज ठाकरे साहेब हे स्वतःची कधीच हार मनात नसत, आज राजकारणात ज्याप्रकारे ठाकरे साहेब काम करतात आणि सत्ताधाऱ्यांची धडकी भरवतात, अशी त्यांची ओळख आहे.

Raj Thackeray Short Biography in Marathi – राज ठाकरे साहेब यांची थोडक्यात माहिती

पूर्ण नाव राज श्रीकांत ठाकरे
टोपणनाव स्वरराज
जन्म १४ जून, १९६८
जन्मस्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
वडील श्रीकांत केशव ठाकरे
आई मधुवंती श्रीकांत ठाकरे
पत्नी शर्मिलाताई ठाकरे
अपत्ये अमित व उर्वशी
प्रेरणास्थान बाळासाहेब ठाकरे,
पेशा राजकारण
राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश,
राज ठाकरेसाहेब बायोग्राफी मराठी – Raj Thackeray Biography in Marathi

आरंभिक जीवन आणि कुटुंब – Raj Thackeray life in Marathi

तुम्हाला माहित असेल, राज साहेबांचे खरे नाव स्वरराज आहे. त्यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबई दादर या ठिकाणी झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत केशव ठाकरे आणि आई मधुवंती ठाकरे ह्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्‍नी कै. मीना ठाकरे यांची बहीण असे नाते आहे.

बाळासाहेब ठाकरे हे राज साहेब ठाकरे यांच्या वडिलांचे मोठे भाऊ आहेत.

राज ठाकरे साहेब यांच्या पत्नीचे नाव शर्मिलाताई ठाकरे आहे आणि त्यांना एक मुलगा त्यांचे नाव अमित व एक मुलगी त्यांचे नाव उर्वशी असा त्यांचा परिवार आहे.

राज साहेबांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले आणि त्यांचे शालेय शिक्षण पण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले. नंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये पूर्ण केले.

तुम्हाला सांगते की, राज ठाकरे साहेब व्यंग्यचित्रकार आहेत. त्यामध्ये वॉल्ट डिस्नी हे त्यांचे प्रेरणास्थान आहे.

ते म्हणाले की, जर मी राजकारणात नसतो तर, नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असते.

राजकीय कारकीर्द – Raj Thackeray Political career in Marathi

त्यांचा जन्म ठाकरे कुटुंबात झाला, त्यामुळे त्यांना लहान पनापासूनच बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे शिकण्यास मिळाले. राज साहेब अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात.

ठाकरे साहेबांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतच सुरू केली. प्रभावी व्यक्तिमत्त्व, दमदार आवाज असणारे राज साहेब यांनी समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळवला.

राज ठाकरे साहेब यांनी जानेवारी मध्ये शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आणि नवीन राजकीय पक्ष सुरु करण्याचे जाहीर केले. त्यांनी ९ मार्च २००६ रोजी मुंबईत “महाराष्ट्र नवनिर्माण सेना” उर्फ मनसे पक्षाची स्थापना केली.

दीपिका पादुकोण बायोग्राफी मराठीत - Deepika Padukone Biography in Marathi

दीपिका पादुकोण बायोग्राफी मराठीत – Deepika Padukone Biography in Marathi

राजा बिरबल यांची माहिती - King Birbal information in marathi

राजा बिरबल यांची माहिती – King Birbal information in Marathi