in

विश्वास नांगरे पाटील यांची माहिती – Vishwas Nangare Patil information in Marathi

Vishwas Nangare Patil information in Marathi essay biograpy life family - विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
image source @ https://jolygram.com/profile/ipsvishwasfc/photo/2047697186695028675_5587147655

Vishwas Nangare Patil information in Marathi – विश्वास नांगरे पाटील यांची माहिती

विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्र पोलिसातील अधिकारी आहेत. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्यांच्या वेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. नांगरे पाटील हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. तसेच ते नवीन विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आयपीएस(IPS) अधिकारी आहेत, १९७३ मध्ये कोल्हापूर जवळील एका छोट्या गावात त्यांचा जन्म झाला.

आई वडिलांचे शिक्षण ज्यास्त झाले नव्हते. त्यांचे वडील नारायण नांगरे पाटील यांचे शिक्षण चौथी इयत्तेपर्यंत आणि आईने दुसर्‍या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते.

Vishwas Nangare Patil Short Biography in Marathi – विश्वास नांगरे पाटील यांची थोडक्यात माहिती

पूर्ण नाव विश्वास नांगरे पाटील
जन्म ५ ऑक्टोबर १९७३
जन्मस्थान कोकरूड, शिराळा तालुका,
सांगली जिल्हा,
महाराष्ट्र, भारत
वडील नारायण नांगरे पाटील
आई
पत्नीचे नाव रुपाली नांगरे पाटील
अपत्ये जान्हवी, रणवीर
पेशा भारतीय पोलिस सेना
शिक्षण बी.ए., एम.बी.ए.
प्रशिक्षणसंस्था कोल्हापूर विद्यापीठ, उस्मानीया विद्यापीठ
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू धर्म
पुरस्कार राष्ट्रपती शौर्य पदक

यांचा जन्म, कुटुंब – Vishwas Nangare Patil personal Information

विश्वास नांगरे पाटील यांचा ५ ऑक्टोबर १९७३ जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावाचे सरपंच होते.

त्यांच्या आई वडिलांचे शिक्षण ज्यास्त झाले नव्हते. त्यांचे वडील नारायण नांगरे पाटील यांचे शिक्षण चौथी इयत्तेपर्यंत आणि आईने दुसर्‍या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते.

नांगरे पाटील यांचे २८ नोव्हेंबर २००० रोजी रुपा नांगरे पाटील यांच्याशी लग्न झाले. धुळे येथे हे लग्न झाले. विश्वासराव पाटील सर त्यावेळी धुळे येथे डेप्युटी एसपी होते.

त्याच्या कुटुंबात त्याची दोन मुले, रणवीर नावाचा एक मुलगा आणि जान्हवी नावाची एक मुलगीही आहे.

शिक्षण आणि यूपीएससी – Education and UPSC

लहान असताना ते अभ्यासात खूप हुशार विद्यार्थी होते आणि दहावीच्या परीक्षेत त्यांनी ८८ टक्के गुण मिळवले होते.

त्यांनी १२ वी सायन्स मधून केली, नंतर त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी.ए. ची परीक्षेमध्ये सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले.

वयाच्या २५ व्या वर्षी आयपीएससाठी निवड झाल्यानंतर ते धुळे, नांदेड, औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तैनात होते.

आयपीएससाठी निवड झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण चालू ठेवले आणि उस्मानिया विद्यापीठातून एम.बी.ए. ची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली.

विश्वास नांगरे पाटील यांची माहिती – Vishwas Nangare Patil information in Marathi

२६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या प्रतिकारात धाडसी भूमिका

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.

ताज हॉटेलमध्ये गोळीबार झाला हे समजल्यानंतर लगेचच विश्वासराव सरांनी एक क्षणही गमावला नाही. रात्री ९:४० ला दहशतवादी आत घुसले होते आणि हल्ल्याच्या ११ मिनिटांतच पाटील व त्यांचे अंगरक्षक त्यांचा शोध घेण्यासाठी ताज इमारतीत घुसले.

त्यांनी बंदुकीतुन गोळीबार करत दहशतवाद्यांचा पाठलाग केला आणि त्यांना ताजमहाल हॉटेल नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले.

इमारतीच्या ‘क्रिस्टल’ हॉलमध्ये लग्नाची पार्टी चालू होती. तिथे ४०० – ५०० लोक होते. त्यांच्या त्वरित कारवाईमुळे दहशतवादी कार्यक्रमस्थळी प्रवेश करू शकले नाहीत आणि शेकडो लोकांचे जीव वाचवू शकले.

त्यावेळेस नांगरे पाटील यांच्या कुटुंबीयांना त्यांचा काहीच अंदाज लागत नव्हता. दुसर्‍या दिवशी पहाटे ४:३० वाजता, दुसर्‍या आयपीएस अधिका्याने वायरलेसवरील त्याचा आवाज ऐकला आणि त्याच्या सुरक्षेबद्दल कुटुंबीयांना माहिती दिली. सकाळी ७.०० च्या सुमारास एनएसजी कमांडोंनी बचाव कार्याचा ताबा घेतल्यानंतर ते घरी परतले.

या लढाई दरम्यानच्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रपतिपदाचे पदक (शौर्य पदक) देण्यात आले.

विश्वास नांगरे पाटील यांचे पुस्तक

मन में है विश्वास” (मराठी) – ह्या पुस्तक मध्ये त्यांनी आपले बालपण ते युपिएससी विषयी चांगली माहिती दिली आहे.


हे पण वाचा :

शिवाजी महाराज यांची माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास

तानाजी मालुसरे यांचा इतिहास


More info : Wiki


तुम्हाला दिलेली संत विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil information in Marathi Essay) यांची माहिती आवडली असेल.

हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद

Chhatrapati Shahu Maharaj information in Marathi Essay - छत्रपति शाहूजी महाराज यांची माहित

Chhatrapati Shahu Maharaj information in Marathi Essay – छत्रपति शाहूजी महाराज यांची माहिती

Bhagat Singh information and Quotes in Marathi - भगतसिंग यांच्या जीवना विषयी माहिती

भगतसिंग यांच्या जीवना विषयी माहिती – Bhagat Singh information and Quotes in Marathi